चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
तीन लाईन नमुन्यातील चंद्रकोर चिन्हांकीत डॉटेड बॉर्डर शिवराई.
दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर. शिव ऐवजी रिव . छत्र वर नाजूक चंद्रकोर चिन्ह. छ चे वेगळे लिखाण.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १२.०४०
प आणि ति मध्ये देवनागरी ८ अंकासारखे चिन्ह. हे चिन्ह व ह्या अक्षरासारखे दिसत असल्याने पति ऐवजी पवति असा शब्द वाटतो. छ आणि त्र मध्ये चार डॉट्स. रा ला एक जाडा काना. जा वळणदार.
दुदांडी नमुन्यातील शिवराई. राजा नंतर चार डॉट्स ची रचना. श्री नंतर एक मोठा भरीव डॉट. छत्र नंतर तेरा शाखा असलेले झाड. छ ला मात्रा. छेत्र च्या वर चार डॉट आणि चंद्रकोर चिन्ह. तेरा शाखा असलेले झाड नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.६९० ग्रॅम.