सीव नमुन्याची शिवराई.
राजा सीव नमुन्याची शिवराई. रा च्या आधी बिंदू नक्षी छ आधी एक बिंदू, प च्या पोटात एक बिंदू. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.१२०
कमळ पुष्प चिन्हांकीत
श्री नंतर पोकळ गोल चिन्ह. पोकळ भाग अगदी लहान. छत्र नंतर कमळ फुल चिन्ह. कमळ फुलाची एक पाकळी नाण्यावर दिसत नाहीये.
नाणे फोटो प्रमाणे.
डबल स्ट्रक शिवराई
जा आणि व ह्या अक्षरांवर ठसा परत एकदा उठला आहे. छ च्या पोटात जाडा मेटल किंवा डॉट चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी नमुन्यातील शिवराई. राजा नंतर चार डॉट्स ची रचना. श्री नंतर एक मोठा भरीव डॉट. छत्र नंतर तेरा शाखा असलेले झाड. छ ला मात्रा. छेत्र च्या वर चार डॉट आणि चंद्रकोर चिन्ह. तेरा शाखा असलेले झाड नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.६९० ग्रॅम.
अधिक व सूर्य चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर अगदी लहान पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या वर अधिक चिन्ह, त्याच्या बाजूला डॉट, छ च्या पोटात एक डॉट. त्र नंतर दोन उभे डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.