डबल स्ट्रक शिवराई.
व या अक्षरावर त्र अक्षरानंतर असलेल्या फुलाचा ठसा परत उठला आहे. त्र नंतर देठ असलेल्या फुलाचे चिन्ह. देठ असलेलं फुल चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. छ काहीसा अस्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.३७० ग्रॅम.
दुदांडी शिवराई. श्री नंतर तीन डॉट्स ची रचना. श्री चा छोटा आकार. त्र क्सचे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९४० ग्रॅम.
छ आणि त्र मध्ये चार डॉट ची रचना. पती ऐवजी पाति असा शब्द. तीन लाईन नमुन्यातील शिवराई.अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
छत्र च्या वर त्रिकोणी आकाराच्या चार डॉट्स ची रचना. त्याच्या बाहेरून जपमाळ प्रकारची बॉर्डर. त्रिकोणी डॉट्स असलेल्या शिवराई दुर्मिळ असतात. छ चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
जाड अक्षर लिखाण असलेली शिवराई. दोन्ही बाजूची अक्षरांची जाडसर लिखावट . श्री ला जादा रकार किंवा जादा धातूचा भाग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.