सूर्य चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. जा नंतर चार डॉट्स. ति नंतर तीन डॉट. राजा सीव नमुना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – १०.२८०
चौकोनी आकाराची शिवराई राजा साव नमुन्याची शिवराई, शिवराईचा आकार चौकोनी. साव अक्षराभोवती अखंड रेषेची बॉर्डर. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री आधी नाजूस चंद्रकोर . त्याच्या भोवती परस्परांना जोडलेल्या ठिपक्यांची बॉर्डर. छत्र आधी तीन डॉट. छत्र वर एक डॉट.
दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : १०.१४० ग्रॅम.
दुदांडी शिवराई
छत्र नंतर दोन उभे डॉट, ति नंतर सहा भरीव डॉट चे फुल. पति ह्या शब्दानंतर फुल हे चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत असून त्यातही सहा डॉट चे मधला भाग पोकळ असलेले फुल चिन्ह अत्यंत कमी आढळून येते. दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.४६० ग्रॅम
दुदांडी शिवराई. छ ला मात्रा. छ च्या आधी डॉट. छत्र नंतर झाड चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.७७०