डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई
डॉटेड बॉर्डर नंतर च्या कालखंडातील शिवराई. छ ला अत्यंत छोटी मात्रा. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.८४०
सदोष लिखाण शिवराई
छत्रपती ऐवजी छत्रपता असा लिखाण दिसून येते. डाय मेकर डाय बनवताना वेलांटी द्यायला विसरल्याने अश्या सदोष लिखाणाच्या शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चिन्हांकीत शिवराई श्री आधी पोकळ गोल चिन्ह. पोकळ गोलाचा गोल भाग अगदी लहान. छत्रच्या वर चार डॉट्स ची नक्षी. अक्षरांची जाड लिखावट. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
अधिक चिन्हांकीत शिवराई छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला डॉट चिन्ह. छत्र नंतर डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री आधी चंद्रकोर. छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन ठिपक्यांची रचना. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ग्रॅम : ८.२७०
राजा शाव नमुना
छ. शाहू महाराज यांची शिवराई. राजा शाव असा उल्लेख असून छत्र च्या वर अस्पष्ट असे अंकुश चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२००