चिन्हांकीत शिवराई
श्री आधी पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र नंतर पाकळी चिन्हाचा भाग दिसत आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.८१०
सदोष लिखाण शिवराई
छत्रपती ऐवजी छत्रपता असा लिखाण दिसून येते. डाय मेकर डाय बनवताना वेलांटी द्यायला विसरल्याने अश्या सदोष लिखाणाच्या शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर असलेली शिवराई.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. राजा सीव नमुना. अक्षरांची बारीक जाडी. छत्र पति भोवती अत्यंत बारीक ठिपक्यांची म्हणजेच मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.५१० ग्रॅम.
दुदांडी शिवराई. श्री आधी चंद्रकोर. छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन ठिपक्यांची रचना. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ग्रॅम : ८.२७०