अधिक चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर छोटे अधिक चिन्ह असून त्या नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.६७०
गोल चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. गोलाचा आकार मोठा असून अक्षरांची जाड लिखावट . छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री ची लहान लिखावट, छत्र वर अधिक चिन्ह, त्याच्या दोन्ही बाजूला तीन डॉट. त्र नंतर तीन डॉट. छ च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.९८०
तीन लाईन नमुन्याची शिवराई. छ चे वेगळे लिखाण, त्र देवनागरी साधर्म्य असणारा. अक्षरांची बारीक लिखावट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.३३० ग्रॅम.
झाड चिन्हांकीत शिवराई
छत्र नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे झाड चिन्ह. झाडांच्या शाखा सलग नसून फक्त खालील आणि वरील शाखा आहेत. मधल्या भागातील शाखा नसलेला झाडाचा नमुना. दुदांडी शिवराई मधील कमी वजनाची शिवराई. दुदांडी मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.