पुष्प चिन्हांकीत शिवराई.
श्री नंतर १२४० हे साल देवनागरी लिपीत. छ ऐवजी छे. छे वर सहा पाकळ्यांचे फुल चिन्ह. त्यानंतर पोकळ गोल चिन्ह.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.४१०
अंकुश चिन्हांकीत शिवराई.
छत्र च्या वर आडवे अंकुश चिन्ह. छ चे वेगळे लिखाण, आडवा दोन गाठ असलेला छ. राजा साव नमुना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर असलेली शिवराई.
तीन लाईन नमुन्याची शिवराई. राजा सीव नमुना. अक्षरांची बारीक जाडी. छत्र पति भोवती अत्यंत बारीक ठिपक्यांची म्हणजेच मोतीचूर ठिपक्यांची बॉर्डर.
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.५१० ग्रॅम.
दुदांडी शिवराई. श्री नंतर पोकळ गोल चिन्ह, सूर्य चिन्ह. त्याच्या भोवती जाड डॉट्स ची बॉर्डर. जा नंतर व छत्र च्या आधी डॉट ची रचना. अक्षरांची जाड लिखावट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – १०.३६०