डेटेड शिवराई
राजा च्या वर १२३२ हे साल देवनागरी लिपीत. ३२ हे अंक व्यवस्थित दिसत आहेत.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम – ९.५६०
कमळ पुष्प चिन्हांकीत
श्री नंतर पोकळ गोल चिन्ह. पोकळ भाग अगदी लहान. छत्र नंतर कमळ फुल चिन्ह. कमळ फुलाची एक पाकळी नाण्यावर दिसत नाहीये.
नाणे फोटो प्रमाणे.
शिवराई वरील अक्षरांची जाडी कमी. पुढील बाजूस बारीक डॉटेड बॉर्डर. श्री चे लिखाण देवनागरी ७ आकड्यासारखे. श्री चा रकार लहान. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
अधिक व सूर्य चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर अगदी लहान पोकळ गोल चिन्ह. छत्र च्या वर अधिक चिन्ह, त्याच्या बाजूला डॉट, छ च्या पोटात एक डॉट. त्र नंतर दोन उभे डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
शिवराई चा आकार आयताकृती. श्री राजा सिव पुढील बाजूस लिहिलं असून मागील बाजूस छत्रपति. छ चे वेगळे लिखाण. तीन गोल गाठ असलेला छ नमुना.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.