चौकोनी आकाराची शिवराई राजा साव नमुन्याची शिवराई, शिवराईचा आकार चौकोनी. साव अक्षराभोवती अखंड रेषेची बॉर्डर. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
चौकोनी आकाराची शिवराई
राजा साव नमुन्याची शिवराई, शिवराईचा आकार चौकोनी. साव अक्षराभोवती अखंड रेषेची बॉर्डर. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.४७०
जा आणि छ चे वळणदार लिखाण. छ ची शीर्ष रेषा छ मधूनच सुरु झालेली. श च्या वेलांटी साठी जाडा दंड रेषा नाही. त्र अत्यंत लहान आकाराचा.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई
छत्र नंतर दोन उभे डॉट, ति नंतर सहा भरीव डॉट चे फुल. पति ह्या शब्दानंतर फुल हे चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत असून त्यातही सहा डॉट चे मधला भाग पोकळ असलेले फुल चिन्ह अत्यंत कमी आढळून येते. दोन्ही बाजू स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ८.४६० ग्रॅम
छत्र च्या वर त्रिकोणी आकाराच्या चार डॉट्स ची रचना. त्याच्या बाहेरून जपमाळ प्रकारची बॉर्डर. त्रिकोणी डॉट्स असलेल्या शिवराई दुर्मिळ असतात. छ चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डाय शिफ्ट अर्धी शिवराई.
पुढील बाजूस नाण्याचा डाय ४५% सरकलेला. रा आधी दोन डॉट्स. र ची आडवी रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार. सिव नमुना. स ला पहिली वेलांटी. पुढील बाजूस अखंड रेषेची बॉर्डर दिसत आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.