चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई.
छत्र च्या वर आडवी मोठी चंद्रकोर, त्याच्या भोवती अखंड रेषेची बॉर्डर. राजा सिव नमुना, स ला पहिली वेलांटी. जा च्या पोटात एक डॉट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.४३०
डेटेड शिवराई
राजा च्या वर १२४० हे साल देवनागरी लिपीत साधारण दिसत आहे. छत्र नंतर झाड चिन्ह. ति नंतर मोठा भरीव डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डबल स्ट्रक शिवराई
जा आणि व ह्या अक्षरांवर ठसा परत एकदा उठला आहे. छ च्या पोटात जाडा मेटल किंवा डॉट चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई. श्री नंतर भरीव गोल, सूर्य चिन्ह असून छत्रपती भोवती जाडसर ठिपक्यांची बॉर्डर दिसत आहे. छत्र च्या वर डॉट्स ची रचना असून अक्षरांची जाडी जास्त. दुदांडी प्रकारातील नाण्यावर डॉटेड बॉर्डर कमी प्रमाणात दिसून येते.दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२३०
शिवराई
श्री नंतर चिन्हाचा काही भाग दिसत असून चिन्ह कोणते आहे ते लक्षात येत नाही. छ वळणदार असून छत्र ची शीर्षरेषा छ मधूनच सुरु झालेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.