अधिक चिन्हांकीत शिवराई
छत्रच्या वर अधिक चिन्ह. छ आडवा, त्याला मात्रा. अक्षरांचा मोठा आकार. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७७०
अंकुश चिन्हांकीत शिवराई.
छत्र च्या वर आडवे अंकुश चिन्ह. छ चे वेगळे लिखाण, आडवा दोन गाठ असलेला छ. राजा साव नमुना.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
पा नमुना शिवराई.
श्री नंतर पा हे देवनागरी अक्षर. पा हे अक्षर अत्यंत स्पष्ट आणि ठळक. छ ला मात्रा .
दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ९.६५० ग्रॅम.
सदोष लिखाण शिवराई.
शिवराई चा आकार लांबट, ओव्हल प्रकारचा. शीव ऐवजी रीव असा शब्द असून, त ला वेलांटी नसल्याने पति ऐवजी पात असा शब्द आहे.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
शिवराई
अक्षरांचा मोठा आकार असल्याने नाण्यावर पुढील बाजूस फक्त राजा ह्या शब्दाचा काही भाग दिसत आहे. छ वळणदार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
दुदांडी शिवराई. श्री नंतर पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, पोकळ गोल, सूर्य चिन्ह. दोन्ही बाजूची चिन्हे एकदम ठळक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन – ८.९७० ग्रॅम.